मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; वाहतूक २० मिनिटे उशिरा

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार व त्यापुढील मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

( हेही वाचा : बॉलिवूडचे रीमेक नव्हेत, हे तर री-डिस्ट्रॉय )

दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे लोकल अतिशय कमी वेगाने चालवल्या जात आहेत.  तांत्रिक बिघाड आणि पावसामुळे कमी झालेली दृश्यमानता असा दुहेरी परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. याचा संपूर्ण परिणाम मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. मुलुंड, भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि घाटकोपर परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here