Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत

100
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत

जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी (५ डिसेंबर) अवकाळी पावसाने (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली पिके संकटात सापडली आहेत. अगोदरच्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला अवकळीने पुन्हा पेचात टाकले आहे. दरम्यान, या पावसाने जिल्ह्यातील कांदा (Onion), द्राक्ष (Grapes), हरभरा, टोमॅटोसह (tomato) मका ही पिके संकटात सापडली आहेत. गुरुवारी रात्रीपासून विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. (Nashik Rain)

हेही वाचा- Sambhal Violence : संभलमध्ये लावणार दंगलखोरांचे पोस्टर्स ; ६ डिसेंबर आणि शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस हाय अलर्टवर!

या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारी (६ डिसेंबर) नाशिक शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर भागात सायंकाळी जोरदार हजेरी लावली. शिलापूर परिसरात मध्यरात्री अचानक आकाशात ढग दाटून आले व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. (Nashik Rain)

हेही वाचा-Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी 

वडाळा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासूनच आभाळाचे वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास शहरात पावसाची सुरुवात झाली, वडाळा परिसरातील साईनाथनगर, विनयनगर, खोडेनगर, भारतनगर, बडाळा रोडसह नागजी परिसरात अवकाळी दणकेबाज पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात काही ठिकाणी संपूर्णपणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप झाला होता. (Nashik Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.