राज्यात मुसळधार : मुंबई, ठाणे, कोकण आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा

मागील दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचलमध्ये ९, मुंबईत ६, राजस्थानात ५, तर हरियाणा व पंजाबमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

249
राज्यात मुसळधार : मुंबई, ठाणे, कोकण आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून लांबला होता. अखेर आता देशात सर्वत्र मान्सूनला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यातील पावसाने जोर धरला आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी दुर्घटना घडली आहे. अशातच मुंबई, ठाणे, कोकण आणि विदर्भाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई, मुंबई, ठाणे शहरात गेल्या २४ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता पुढील दोन दिवस संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भाच्या काही भागांसह अन्य काही भागात यलो अलर्ट दिला आहे. तर मागील दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचलमध्ये ९, मुंबईत ६, राजस्थानात ५, तर हरियाणा व पंजाबमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर; ‘वंदे भारत’ रेल्वेला दाखवणार हिरवा झेंडा)

पावसाचा हाहाकार; केदारनाथ यात्रा रविवारपासून बंद

छत्तीसगडमध्ये वीज पडून ५ लोकांचा मृत्यू झाला. विविध राज्यांतील अनेक मार्ग बंद आहेत. हिमाचलमध्येच पावसामुळे १०२.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात ४८ तासांत भूस्खलनाच्या दोन घटना घडल्या. यामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग-२१ सात मैल आणि चार मैलाजवळ अनेक तास बंद होता. या मार्गावर खोळंबलेली वाहतूक २० तासांनंतर सुरळीत झाली. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ महामार्गाचा एक भाग खचला आहे. याच पार्श्वभूमीवर आणि खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा रविवारपासून (२५ जून) बंद आहे. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. आसाममध्ये दोन लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. येथे बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.