पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; सात जणांचा मृत्यू

विदर्भात दोन दिवस झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये १६ गुरांचा मृत्यू झाला. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे ३२,७८५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण सुरु असून बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : मुंबईतील विविध ठिकाणी २ ऑक्टोबरपासून पॉलिक्लिनिक सुरु; सकाळी सात ते रात्री दहापर्यंत मिळणार उपचार सेवा)

कुटुंबांना स्थलांतरित केले 

पश्चिम विदर्भातील २० तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टर शेतजमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

१६ जनावरांचा मृत्यू, ३६३ घरांची पडझड

या आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात चार, बुलडाणा जिल्ह्यात पाच व वाशिम जिल्ह्यात एक अशा एकूण लहान-मोठ्या १६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. विभागात सध्या हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे पिकांच्या पंचनाम्यात अडथडे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. वाशिम जिल्ह्यात १७,०८४ हेक्टरमधील तूर, सोयाबीन व कपाशी तसेच संत्रा पिकांचे ३३ टक्के नुकसान झालेले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ३३४, अकोला २५ व यवतमाळ जिल्ह्यात चार अशा एकूण ३६३ घरांची पडझड झालेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here