मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. याच्या परिणामस्वरूप राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आहे. (Heavy Rain)
ठाणे (Thane) जिल्ह्यातील सावरणे, मोरोशी, टोकावडे, उमरोली या विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या संपूर्ण परिसरातील अनेक वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले आहे. या भागातील अनेक घरांवरील कौले पत्रे, छप्पर उडून गेले आहेत. (imd alert for rain)
वर्गखोल्यांमध्ये साठले पाणी
वादळी वाऱ्यांमुळे मुरबाड (Murbad) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) या शाळेवरील छत उडून गेले आहे. छप्पर उडून गेल्याने शाळेतील वर्गखोल्यांमध्येही पावसाचे पाणी साठून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या भोजनालयाच्या वरचे संपूर्ण छप्पर उडून गेल्यामुळे त्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. वीजेचे खांब उडून गेल्यामुळे परिसरातील लाईट रात्रीपासूनच गेली आहे. शाळेच्या परिसरातील वृक्षही उन्मळून पडले आहेत.
रविवारी नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांनाही गारपिटीचा फटका बसला. या तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाल्याने उन्हाळा कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकांचे नुकसान झाले आहे. (Weather Alert) हवामान विभागाने पुढील दोन दिवसही नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Heavy Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community