Heavy Rain : राज्यात ‘या’ भागात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट

165
Heavy Rain : राज्यात 'या' भागात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट
Heavy Rain : राज्यात 'या' भागात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट

राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच भारतीय वेधशाळेने आता अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट बंद केला आहे. राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता असली तरीही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रेड ऐवजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात ११५.६ ते २०४.४ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसासाठी राज्या जवळील मान्सून ट्रफ पोषक ठरले होते. हा ट्रफ आता उत्तरेकडे सरकल्याने राज्यात आता पूरपरिस्थितीसाठी कारणीभूत ठरणारा पाऊस फारसा होणार नाही. रेड ऐवजी ऑरेंज अलर्ट जारी केल्यास अतिवृष्टीची दाहकता कमी जाणवते.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लवकरच देशात नवीन शिक्षण पद्धती लागू होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

राज्यातील इतर भागात मंगळवारपर्यंत मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट कायम राहील. कोकणात, मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात एक ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस राहील. पुढील पाच दिवस किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. विदर्भात पुढील तीन दिवस बऱ्याच भागात मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.