मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. शनिवार-रविवार जोडून सुट्ट्या आल्या की, अनेक जण लोणावळ्याची वाट धरतात. केवळ मुंबईतूनच नाही, तर महाराष्ट्रातून अनेक पर्यटक लोणावळ्याला भेट देत असतात. लोणावळा किंवा पुढे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करावा लागतो. या महामार्गावर अनेकवेळा अपघात होताना दिसतात. यासाठीच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : भराडी देवीच्या जत्रेक जातास, मगे ही बातमी वाचा… )
दिवसा वाहतूक बंद
लोणावळा शहरातील वाढत असलेले अपघात लक्षात घेता, शहरात होणारी अवजड वाहनांची वाहतूक सकाळी सात ते रात्री नऊ या काळात बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक वलवण ते खंडाळा या बायपास वजा द्रुतगती मार्गावर वळविण्यात येणार आहे. लोणावळा शहरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या हलगर्जीपणामुळे अपघात वाढले आहेत, असा आरोप करत नागरिकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
( हेही वाचा : मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा म्हणून सरकारचे विशेष अभियान )
नागरिकांच्या मागण्या मान्य
यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते राकेश सोनवणे यांनी शहरातील जागरूक नागरिक व सर्व पक्षीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community