Helicopter Crash: गुजरातच्या पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार

76

भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर (Gujarat Porbandar helicopter crash) येथे रविवारी दुपारी 12 वाजता कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर ध्रुव नियमित उड्डाण करत होते. (Helicopter Crash)

गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. यामध्ये प्रत्यक्षात तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर (helicopter crash) तेथे कोसळले आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एएलएच ध्रुव (ALH Dhruva helicopter crash) नियमित उड्डाण करत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात तीन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

(हेही वाचा –Chhattisgarh मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान हुतात्मा )

गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) प्रगत हलके हेलिकॉप्टर (ध्रुव) पोरबंदर किनाऱ्याजवळ (Porbandar Beach) अरबी समुद्रात पडले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधील चार क्रू मेंबर्सपैकी एक जण बचावला, तर तीन क्रू मेंबर्स बेपत्ता झाले.

तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला

हेलिकॉप्टरच्या (helicopter) टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.