Helicopter Crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यामध्ये ३ हेलिकॉप्टर होते.

166
Helicopter Crash: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी कोसळले. त्यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदुल्लाहियानही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार हेलिकॉप्टर अद्याप बेपत्ता आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याचे इराणच्या गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, खराब हवामानामुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकलेले नाही. मात्र बचावासाठी अनेक ड्रोन पाठवण्यात आले आहेत.

रायसी यांच्या ताफ्यात ३ हेलिकॉप्टर होते
अध्यक्ष रायसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते, त्यापैकी २ हेलिकॉप्टरमध्ये मंत्री आणि अधिकारी होते आणि ते सुरक्षितपणे इराणला पोहोचले. राष्ट्रपती हेलिकॉप्टर सोबत असताना परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदुल्लाहियान तिथे होते. रायसी १९ मे रोजी सकाळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. आरस नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे, जे दोन्ही देशांनी संयुक्तपणे बांधले आहे.

.(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबईत ५,८३६ वाहनांची झाडाझडती)

रईसी हे रविवारी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांच्यासोबत एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानमध्ये गेले होते. दोन्ही देशांनी असार नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराणचे ६३ वर्षीय राष्ट्रपती रईसी हे कट्टरतावादी असून, त्यांनी इराणच्या न्यायपालिकेचं नेतृत्वही केलेलं आहे. रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे शिष्य मानले जातात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.