शहरात 1 डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती, ‘या’ ठिकाणांवर होणार चेकिंग

71

सुरक्षित आणि सुखरुप प्रवासासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येते. मोटार वाहन कायद्यानुसार विनाहेल्मेट गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळेच आता नाशिक पोलिसांनी याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून नाशिक शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, विनाहेल्मेट दुचाकी चालवणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा दुचाकीस्वारांवर 500 रुपये दंड देखील आकारला जाणार आहे.

विनाहेल्मेट फिरणा-यांवर कारवाई

नाशिक शहराचे तत्कालन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर शहरातील हेल्मेट सक्तीची मोहीम काही काळ थंडावली होती. पण आता पुन्हा एकदा या मोहिमेंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दुचाकीस्वारांना एका आठवड्याची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने 1 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः फक्त ‘ही’ गोष्ट करा आणि 68 लिटरपर्यंतचे पेट्रोल-डिझेल मोफत मिळवा)

हे आहेत चेकिंग पॉइंट

नाशिक पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास करणा-यांना अडवण्यासाठी चेकिंग पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉइंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉइंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक आणि बिटको कॉलेजसमोर चेकिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत पोलिसांकडून चेकिंग करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.