New Driving Rules : हेल्मेटवर कॅमेरा लावताय? ड्रायव्हिंग लायसन्स होऊ शकते रद्द!

आपण बऱ्याचदा रस्त्यांवरून जाताना किंवा व्हिडिओमध्ये बाईक चालवणाऱ्या काही व्यक्तींच्या हेल्मेटवर कॅमेरा (helmet Mount camera) लावण्यात आल्याचे पाहिले असेल. काही युट्यूबर सुद्धा हेल्मेटवर कॅमेरा लावून आपल्या प्रवासाचे शुटिंग करत सोशल मिडियावर शेअर करतात. मात्र आता तुम्ही हेल्मेटवर कॅमेरा लावून प्रवास करणार असाल तर तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते. केरळ राज्याच्या मोटार वाहन विभागाने नवा नियम आणला असून यानुसार एखादी व्यक्ती बाईक चालवत असेल आणि त्याच्या हेल्मेटवर कॅमेरा लावलेला असेल तर संबंधित व्यक्तीला १ हजार रुपये दंड भरावा लागेल आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकते.

( हेही वाचा : Jio Offer – जिओ युजर्ससाठी नवा प्लॅन; ९१ रुपयांत महिनाभर Unlimited डेटा आणि कॉलिंग)

मायकल शूमाकरचे उदाहरण

केरलमधील मोटार वाहन विभागाने गेल्यावर्षी हा नियम लागू करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा, सार्वजनिक रस्त्यांवरील गाड्यांच्या शर्यती, स्टंट्स, समाजविघातक कृत्य रोखणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. मात्र यावर्षी वाहन विभागातर्फे बाईक चावणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे.

प्रसिद्ध ड्रायव्हर मायकल शूमाकर याचा बर्फात अपघात झाला होता. यावेळी मायकल शूमाकरला झालेल्या दुखापतीमागचे मुख्य कारण हेल्मेटवर लावण्यात आलेला कॅमेरा होता, असे उदाहरण हेल्मेटवरील कॅमेऱ्यास बंदी घालण्याच्या निर्णयामागे देण्यात आले. मात्र काही प्रसिद्ध कंपन्यांनी केलेल्या टेस्टिंग दरम्यान असा दावा करण्यात आला आहे की, अपघात झाल्यास हेल्मेटवर पडणारा दबाव कॅमेरा झेलतो त्यामुळे कॅमेरा लावणे सुरक्षित आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here