मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या ११ महिन्यांत ९६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिली आहे.
या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य मिळत असल्याने आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्याने जास्तीत गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत करण्यात आले आहे.
(हेही वाचा – ओडिशाच्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…)
राज्यातील एकही सर्वसामान्य-गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
रुग्णसेवेचा आलेख
- जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाख
- ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख
- सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख
- ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख
- नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख
- डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख
- जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख
- फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख
- मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख
- एप्रिल २०२३ मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख
- मे २०२३ मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख
हेही पहा –
Join Our WhatsApp Community