राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेल्पलाइनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होत असल्याने राज्य मंडळाने केलेल्या उपाययोजना, परीक्षेचे स्वरूप, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी!
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
Join Our WhatsApp Community