महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी ०२३८२-२५१६३३ आणि इयत्ता बारावीसाठी ०२३८२-२५१७३३ या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक आणि शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव एस.सी. फडके यांचा भ्रमणध्वनी ९४२१०३०७१०, सहा.सचिव ए.आर.कुंभार ९४०५०७७९९१, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. ८३७९०७२५६५, ए.सी.राठोड (क.लि) मो.नं. ८३२९४७१५२३ तर माध्यमिकसाठी ए.पी. चवरे (व.अ) मो.क्र. ९४२१७६५६८३ तर आर.ए. बिराजदार (क.लि) मो.क्र. ९८९२७७८८४१ हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे.
तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी ९३७१२६१५००, बी.एम.कारखेडे मो.क्र. ९८६०९१२९९८, पी.जी. सोळंके मो.क्र. ९८६०२८६८५७, बी. एच. पाटील ९७६७७२२०७१ यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.
Join Our WhatsApp Community