इयत्ता १०वी, १२वीच्या परीक्षेसंदर्भात शंका आहे? मुंबई विभागीय मंडळाच्या ‘या’ Helpline वर थेट साधा संपर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांचे शंकानिरसन करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून समुपदेशनासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविली आहे.

(हेही वाचा – Indian Currency: नोटांवर का असतात ‘या’ तिरक्या रेषा? तुम्हाला माहितीये का? वाचा…)

शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा ही दि. 21 जुलै 2022 ते दि. 12 ऑगस्ट 2022 कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा दि. 27 जुलै 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित केल्या आहेत. परीक्षेचे निश्चित केलेले स्वरूप व मंडळामार्फत केलेल्या विशेष उपाययोजना या संदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.

या हेल्पलाईनवर साधा संपर्क

या नियंत्रण कक्षामार्फत नियुक्त समुपदेशकांमार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा दि.21 जुलै 2022 पासून कार्यान्वित करण्यात येत असून नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी 9.00 ते रात्री 7.00 या वेळेत सुरु राहणार आहे. मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण हेल्पलाईनसाठी दूरध्वनी क्रमांक: (022) 27893756, (022) 27882075 असा आहे. तर समुपदेशनासाठी  मुरलीधर मोरे (भ्रमणध्वनी क्रमांक 9322105618 ) व चंद्रकांत ज. मुंढे (भ्रमणध्वनी क्रमांक 8169699204) हे उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे सचिव बोरसे यांनी कळविली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here