गेल्या वीस वर्षांपासून स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली आहे. महिलांप्रमाणे पुरुषांनाही स्तन कर्करोगाची बाधा होत असल्याचे निदान होत आहे. पुरुषांमध्ये होणा-या स्तन कर्करोगाचे प्रमाण केवळ एक टक्के जरी असले तरीही महिलांमध्ये प्रचंड वेगाने स्तन कर्करोगाची बाधा वाढू लागली आहे.
या वाढत्या प्रमाणात होणा-या अनुवांशिकतेनेही स्तनांचा कर्करोग महिलांना होऊ शकतो, अशी दाट शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून उमटली आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णांबाबत भारतीयांमध्ये असलेला संकुचित दृष्टीकोन बदलायला हवा, असे आवाहन कर्करोगतज्ज्ञांनी केले.
(हेही वाचाः रस्ता पार करताना या संकटग्रस्त गर्भवती कासवाची अंडी फुटली)
अनुवांशिकतेमुळे दहा टक्के स्तन कर्करोग
२०१२ साली देशात महिलांमधील स्तन कर्करोगाचे प्रमाण अंदाजे १ लाख २८ हजारांच्या आसपास दिसून आले. २०२० साली स्तन कर्करोगामुळे १ लाख ७५ हजार महिला बाधित असल्याचे नोंदवण्यात आले. कर्करोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, अनुवांशिकतेने स्तन कर्करोगाच्या गाठी एका पिढीतून दुस-या पिढीत किंवा सख्ख्या भावंडांमध्ये दिसून आल्या आहेत. अनुवांशिकतेमुळे अंदाजे दहा टक्के स्तन कर्करोगाच्या गाठी सख्खी भावंडे किंवा मुलांमध्ये दिसून आल्या आहेत.
कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला
पूर्वी पन्नाशीला पोहोचलेल्या महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे दिसून यायचे. आता पंचविशीतल्या महिलेलाही स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेला चाळीस वय पूर्ण होण्याअगोदर स्तन कर्करोग झाला असेल तर अनुवांशिकतेमुळे आम्ही तातडीने तिच्या भावंडांनाही स्तन कर्करोगाची तपासणी सूचवतो. काही केसेसमध्ये मॅमोग्राफीसह, स्तनांची एमआरआय चाचणीही सूचवली जाते.
(हेही वाचाः चेंबूरच्या रुपाली चंदनशिवे प्रकरणात महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी)
कर्करोगाच्या गाठी काढता येतात
स्तन कर्करोगाच्या उपचारांत शस्त्रक्रिया सूचवली असेल तर स्तन काढलेच जाते असे नाही. सध्याच्या घडीला ६० टक्के केसेसमध्ये शस्त्रक्रिया करुन केवळ स्तनातील कर्करोगाच्या गाठी काढल्या गेल्या आहेत. स्तन वाचवता येते, असेही कर्करोगतज्ज्ञ म्हणाले.
काय कराल?
- चाळीस वय उलटल्यानंतर स्तनांची क्ष-किरण चिकित्सा (मॅमोग्राफी) वर्षातून एकदा जरुर करावी
- आईला स्तन कर्करोग झाला असेल तर मुलांनी पस्तिशीनंतर स्तन कर्करोगासाठी आवश्यक तपासण्या दर वर्षाला करुन घ्याव्यात