Israel–Hezbollah Conflict : पुन्हा युद्ध भडकणार ?; हिजबुल्लाहने इस्रायलवर डागले 250 रॉकेट

Israel–Hezbollah Conflict : हिजबुल्लाहने गोलन हाइट्ससह १५ इस्रायली ठिकाणांना निशाणा बनवण्यासाठी १५० रॉकेट आणि ३० स्फोटक ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यात किमान २ लोक जखमी झाले आहेत.

153
Israel–Hezbollah Conflict : पुन्हा युद्ध भडकणार ?; हिजबुल्लाहने इस्रायलवर डागले 250 रॉकेट
Israel–Hezbollah Conflict : पुन्हा युद्ध भडकणार ?; हिजबुल्लाहने इस्रायलवर डागले 250 रॉकेट

इस्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas war) अजून धुमसत असतांनाच आता हिजबुल्लाहनेही आगीत तेल ओतले आहे. लेबेनॉनची आतंकवादी संघटना हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर रॉकेट हल्ले केले. यामुळे आता मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची भीती वर्तवली जात आहे. (Israel–Hezbollah Conflict)

मंगळवारी इस्रायलच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर अबू तालेब (Abu Taleb) मारला गेला होता. याच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने हा हल्ला केला. हा हल्ला अबू तालेबचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असे हिजबुल्लाहने सांगितले आहे.

(हेही वाचा – “मी पराभूत झाले आहे, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana नेमकं काय म्हणाल्या ?)

हिजबुल्लाहने गोलन हाइट्ससह १५ इस्रायली ठिकाणांना निशाणा बनवण्यासाठी १५० रॉकेट आणि ३० स्फोटक ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यात किमान २ लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायली सैनिकांनीही अनेक ड्रोन आणि रॉकेट नष्ट केले. काहींचे ब्लास्ट झाल्याने आगीच्या घटना घडल्या. इस्रायली सैन्याने ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली आहे.

हिजबुल्लाहने दिली कबुली 

इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले केल्याची कबुली हिजबुल्लाहने दिली आहे. हिजबुल्लाहने यापूर्वी बुधवारीही इस्रायलवर २०० रॉकेट डागले होते. इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहने गुरुवार, १३ जून रोजी इस्रायलवर १५० हून अधिक मोठे रॉकेट आणि ३० डोन हल्ले केले. त्यांच्या रॉकेट आणि ड्रोनने इस्रायली सैन्याच्या ९ ठिकाणांना आणि निशाणा बनवले. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. हिजबुल्लाहने बुधवारीही इस्रायलवर २५० रॉकेट डागले होते. (Israel–Hezbollah Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.