महिला डॉक्टरच्या खोलीत होता हिडन कॅमेरा, मग झाले असे…

118

सीसीटीव्ही कॅमे-यातून अनेक अपघात आणि गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होते. त्यामुळे या उपरवाल्याची नजर आपल्यावर सदैव आहे या भीतीने अनेक गुन्हेगार गुन्हा करण्याआधी अनेकदा विचार करतात. पण या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून एक मोठा गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

असा उघडकीस आला प्रकार

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणा-या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे कॅमेरे बल्बमध्ये लावण्यात आले असल्याचे समजत आहे. संध्याकाळी घरी आल्यानंतर जेव्हा महिला डॉक्टरला बाथरुममधील बल्ब लागत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा हा प्रकार हा उघडकीस आला. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस स्थानकात आपली तक्रार नोंदवली आहे.

(हेही वाचाः आधी पोलिसांना नडला, नंतर रडला!)

महिलेची पोलिसात तक्रार

हा प्रकार 6 जुलै रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 7.30 च्या मध्ये करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारती विद्यापिठातील रुग्णालयात काम करणारी ही पीडित महिला 6 जुलै रोजी सकाळी 8.45 वाजता आपल्या रुग्णालयाच्या क्वार्टरमधून बाहेर पडली. ती जेव्हा रात्री घरी आली तेव्हा बाथरुमचा बल्ब लावण्याचा प्रयत्न केला असता तो बंद पडला असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर बल्बमध्ये काहीतरी बिघाड असल्याचा तिला संशय आला. त्यानंतर तिने बल्ब दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिशियनला बोलावले असता, बल्बमध्ये हिडन कॅमेरा असल्याचे तिला समजले. त्यानंतर महिलेने आपल्या खोलीतील इतरही बल्ब तपासले असता बेडरुमच्या बल्बमध्ये देखील असेच सीसीटीव्ही कॅमेरे लपवण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ताबडतोब महिलेने पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार नोंदवली.

पोलिसांचा तपास

भारती विद्यापीठ पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कलास्कर आण महिला पोलिसांच्या पथकाने महिलेच्या खोलीची तपासणी केली. महिलेने घर सोडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने खोट्या चाव्यांच्या सहाय्याने खोलीचे दार उघडून खोलीत प्रवेश केल्याचे पोलिसांना तपासात लक्षात आले आहे. या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

(हेही वाचाः बार मालकांनंतर आता व्यापाऱ्यांकडून ‘वसुली’? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.