शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनीही त्यांच्यातील खदखद या निमित्ताने बाहेर काढली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विशेषत: मुंबईतील सामान्य शिवसैनिक आक्रमक झाला आहे. बंडखोरीमुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर नाराज झाला असून, रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसह सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यभरातील विशेषत: मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
( हेही वाचा: तेजसचे लाँचिंग लांबणार )
पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश
महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेषत: मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी, यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या निमित्ताने पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community