…तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून Bombay High Court चे राज्य सरकारवर ताशेरे

211
...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे

मुंबईत शपथविधीला सर्व व्हीआयपी लोक आले होते. त्यावेळी याच रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसत नव्हता. आता पुन्हा फेरीवाल्यांनी फुटपाथ आणि रस्ते व्यापलेले आहेत. उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही फोर्ट परिसरातील फेरीवाले (unauthorized hawkers) हटत नसल्याने नागरिकांना चालण्यासही जागा नसल्याची तक्रार याचिकाकर्ते बॉम्बे बार असोसिएशनने (Bombay Bar Association) न्यायालयात केली. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. बार असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकदास यांनी न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांनी युक्तीवाद केला. अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने मुंबई उच्च न्यायालायने (Bombay High Court) नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा – मुंबईकरांना जशी मुंबई पाहिजे तशी मुंबई देणार; Eknath Shinde यांचं आश्वासन)

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा

फेरीवाल्यांच्या परवान्यांची मुदत संपली आहे. इथे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे. फुटपाथवर चालण्याच्या त्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. सरकार कायद्याची अंमलबजावणी करणार नसेल, तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या, आम्ही काही करणार नाही. फोर्ट परिसरात पोलिस चौकी असूनही पोलिस अनधिकृत फेरीवाल्यांकडे डोळेझाक करत करतात. ‘पोलिसांच्या समोर अनधिकृत फेरीवाले बसले असताना ते कारवाई का करत नाही? जर सरकारला कायद्याची अंमलबजावणी करायची नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. आम्हीही काही करणार नाही. कारण आम्ही कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाही. ती यंत्रणा तुमच्याकडे आहे. सामान्य नागरिकांना कायदा हातात घेऊन मनमानी कारभार करू द्या, असे न्यायालयाने सरकारला सुनावले.

संबंधित फेरीवाले परवानाधारक आहेत. पोलिस अनधिकृत फेरीवाल्यांसह अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येते. टाऊन वेंडिंग कमिटीबाबत मुंबई महापालिकेला लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, असा युक्तिवाद अधिकृत फेरीवाल्यांतर्फे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई आणि गायत्री सिंह यांनी केला. त्यावरही न्यायालयाने खडे बोल सुनावले.

पोलीसच फेरीवाल्यांचा परवाना तपासतील

फोर्ट परिसरात बसणारे काही फेरीवाले अधिकृत असल्याचे पालिकेने सांगितल्याने पोलीस कारवाई करत नाहीत. मात्र, यापुढे पोलीसच फेरीवाल्यांचा परवाना तपासून कारवाईसंदर्भात निर्णय घेतील, असे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले. या वेळी अनधिकृत फेरीवाल्यांमुळे (unauthorized hawkers) शहरातील फुटपाथवरून नागरिकांना चालण्यास जागा नसल्याची दखल घेत न्यायालयाने याबाबत स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.