नाशिकमधील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लिमिटेड या कारखान्यातील पॉलीफायर या प्लांटला ११ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 जणांना रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, तसेच घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यावर केली.
आग वाढत आहे
ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाक्यांना लागली. त्यामुळे आगीने अजुनच जास्त भड़का घेतला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमी पर्यंत गावांमध्ये जोरदार हादरे बसून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. विशेष म्हणजे ज्या दोन केमिकल युक्त टाक्या जळून खाक झाल्या, त्यांच्या शेजारीच हजारों टन स्क्रैप मटेरियलने पेट घेवुन आग वाढत आहे, तर तिथेच सुमारे अठरा हजार लीटर क्षमतेची केमिकल भरलेली एक मोठी टाकी असून आग त्या टाकीपर्यंत जात आहे. जर या टाकीने पेट घेवुन भड़का झालाच तर कारखान्यातील एक पेट्रोल पंप आणि इतर सर्वच ठिकाणी आग लागण्याची चिन्हे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी. गंगाधरण, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचेसह जिल्हाभरातील मुख्य पोलिस यंत्रणा व त्यांचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.