-
ऋजुता लुकतुके
एअरटेल आणि जिओ या भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीशी करार करून स्टारलिंक ही अतीजलद इंटरनेट सेवा भारतात आणण्याचा घाट घातला आहे. स्टारलिंक ही उपग्रहाशी जोडली गेलेली जलद इंटरनेट सेवा आहे. या दोन कंपन्या आता लो-अर्थ-ऑरबिट सेवा भारतीय ग्राहकांना देणार आहेत. यामुळे इंटरनेटचं जाळं भारतातील अगदी दुर्गम गावांपर्यंतही पोहोचू शकेल. (High Speed Internet)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक अंतिम सामन्यात पीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आयसीसीचं स्पष्टीकरण)
देशात उपग्रह दळणवळणाचं एक नवीन युग यामुळे सुरू होणार आहे. स्टारलिंकची सेवा उद्योगांबरोबरच किरकोळ ग्राहकांनाही उपलब्ध होईल. देशातील ग्रामीण खेडी, आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण शाळा यांच्यापर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी या प्रणालीचा प्रभावी वापर होऊ शकेल. स्टारलिंकच्या उपकरणांबरोबरच त्यांची जोडणी आणि इंटरनेट सेवा वापरताना लागणारी इतर मदतही जिओ व एअरटेल या कंपन्या पुरवतील. दोन्ही कंपन्यांच्या सध्या उपलब्ध असलेल्या फायबर सेवांच्या बरोबरीने ही उपग्रह सेवा काम करेल. या सर्व सेवा एकमेकांना पूरक असतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. (High Speed Internet)
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?)
यापूर्वी जिओ कंपनीने इंटरनेट सेवांसाठी एसईएस कंपनीशी संयुक्त भागिदारी जाहीर केली आहे. तर एअरटेलही युटेलसॅट वनवेब या कंपनीबरोबर बोलणी करत आहे. या करारांमुळेही देशातील मोबाईल सेवांवर परिणाम होणार आहे आणि मोबाईल टेलिफोनीमध्ये सुधारणांबरोबरच स्पर्धाही तीव्र होत जाणार आहे. स्टारलिंकबरोबर दोन्ही कंपन्यांनी केलेले करार अधिकृत आणि दोघांकडून शिक्कामोर्तब झालेले असेल. तरी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाची परावानगी अजून बाकी आहे. (High Speed Internet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community