High Alert in Mumbai : मुंबईत हायअलर्ट; केरळमधील बॉम्बस्फोटांनंतर का वाढवली छाबड हाउसची सुरक्षा ?

केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात छाबड हाउस इमारतीमध्ये यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्या इमारतीला मोठ्या प्रमाणात संरक्षण देण्यात आले आहे.

178
HighAlert in Mumbai : मुंबईत हायअलर्ट; केरळमधील बॉम्बस्फोटांनंतर का वाढवली छाबड हाउसची सुरक्षा ?
HighAlert in Mumbai : मुंबईत हायअलर्ट; केरळमधील बॉम्बस्फोटांनंतर का वाढवली छाबड हाउसची सुरक्षा ?

केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. (High Alert in Mumbai) केरळमध्ये शनिवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे. केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह, पुणे आणि दिल्लीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. (High Alert in Mumbai)

26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही दहशतवाद्यांनी छाबड हाउस इमारतीला लक्ष्य केले होते. त्यानंतर नेहमी या इमारतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो, मात्र आज केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांनी छाबड  हाउस इमारतीच्या गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खाबड इमारतीच्या गल्लीमध्ये जाणारा एक-एक गाडीचा आणि नागरिकांचा पोलीस कसून चौकशी करत आहेत. (High Alert in Mumbai)

केरळमध्ये रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. (Kerala Blasts) केरळच्या एर्नाकुलममध्ये कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या तीन स्फोटांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदुक, काडतुसे, एक बॅटरी आणि इतर आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Kerala Blasts)

या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. संवादादरम्यान परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. स्फोटावेळी सुमारे 2500 लोक तिथे उपस्थित होते. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत. (High Alert in Mumbai)

शनिवारी केरळमधील मलप्पुरम येथे हमासच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. हमासचा माजी प्रमुख खालिद मिशेल यांनीही या सभेत भाषण केले होते आणि आज एर्नाकुलमच्या कलामस्सेरी भागातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला. स्फोटामागचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त स्फोटाचा आवाज ऐकू आला. एनआयए आणि आयबीची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.  (Kerala Blasts)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.