नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश करण्याबाबत विधान परिषदेत (Chandrkant Patil) पहिल्यांदाच चर्चा झाली. जगभरातील विविध क्षेत्रात ज्ञान आणि माहितीसाठी चर्चा आणि आव्हानांचा विषय ठरलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) (Artificial Intelligence-AI) हा विषय नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिला जात आहे. त्यासाठी मागणीही असून या विषयात पदवी घेणारे १४ हजार २७७ विद्यार्थी आहेत, तर पदवी देणारी २२० महाविद्यालये आणि पदविका देणाऱ्या ४१ संस्थांमध्ये १ हजार ९४७ विद्यार्थी ‘एआय’ चा अभ्यास करत आहेत. त्यांना पदवी प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणातही या विषयाचा समावेश करवा, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी एआय हा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. यासाठी विविध क्षेत्रात निर्माण होणारी आव्हाने त्यावरील काही पर्याय आताच विचारात घेऊन उपाय करण्याच्या सूचना त्यांनी मांडल्या. भारतीय यांनी राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या २३ लाख विद्यार्थ्यांना एआयच्या विषयावर सर्वंकष विचार करून रोडमॅप तयार करावा लागेल, अशी मागणी केली.
“एआय”चा उपयोग रोजगारवाढीसाठी होतोय का?
एआयचा उपयोग रोजगारवाढीसाठी होतोय का, यावर विचार होण्याची गरज आहे. यासाठी विविध अभ्यासक्रम, शाखांची आवश्यकता असल्याने उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. यावर मंत्री चंद्रकांत पाटील सर्व सूचना मान्य असल्याचे सांगितले तसेच अशा कुठल्याही विषयात सरकार मागे राहणार नसल्याचेही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community