सकल वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाने एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. देशांतर्गत व्यवहार (13.4% वर) आणि आयातीमधील (8.3% वाढ) मजबूत वाढीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 12.4% ची लक्षणीय वाढ दिसून येते. परतावे दिल्यानंतर, एप्रिल 2024 मध्ये निव्वळ GST महसूल संकलन 1.92 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.1% ची प्रभावी वाढ दर्शवते.
एप्रिल 2024 संकलनाची वर्गवारी
- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी): 43,846 कोटी रुपये
- राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी): 53,538 कोटी रुपये
- एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी): 99,623 कोटी रुपये, ज्यात आयात मालावरील 37,826 कोटी रुपये कर संकलनाचा समावेश
- उपकर : 13,260 कोटी रुपये, ज्यात आयात मालावरील 1,008 कोटी रुपयांच्या कर संकलनाचा समावेश आहे.
(हेही वाचा Congress : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात, मतदान काँग्रेस किंवा डाव्यांना करू नका तर भाजपाला करा)
आंतर-सरकारी सेटलमेंट : एप्रिल 2024 मध्ये, केंद्र सरकारने संकलित केलेल्या आयजीएसटीमधून 50,307 कोटी रुपये सीजीएसटी आणि 41,600 कोटी रुपये एसजीएसटीमध्ये दर्शवले आहेत. या नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल, 2024 साठी सीजीएसटी द्वारे एकूण महसूल संकलन 94,153 कोटी रुपये तर एसजीएसटी द्वारे एकूण महसूल संकलन 95,138 कोटी रुपये आहे.
Join Our WhatsApp Community