गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्य मागे सरकले आहे. आता पश्चिम बंगाल राज्याच्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये देशभरात पहिला क्रमांक लागला आहे. महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे.
( हेही वाचा : ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद)
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.४५ टक्के नोंदवले जात आहे. महाराष्ट्रात आता दशलक्ष लोकसंख्येमागे १३३ कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आढळून येत आहे. गुरुवारी मुंबईत दोन, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काही अंशाने कमी होत आता ९७.९५ टक्क्यांवर आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
२३० रुग्णांची प्रकृती गंभीर
१२ जुलैच्या नोंदीनुसार, राज्यात २३० कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले. त्यापैकी १३५ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. २८ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास तर १०७ रुग्णांना ऑक्सिजनवर उपचार दिले जात आहेत. राज्यात अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर ९५ रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारी राज्यात २ हजार २२९ नवे कोरोना रुग्ण आढळले तर गेल्या २४ तासांत २ हजार ५९४ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आता १६ हजार ५५३ सक्रीय कोरोना रुग्णांवर विविध भागांत उपचार दिले जात आहेत.
Join Our WhatsApp Community