Highest Paid CEO : भारतीय वंशाच्या या सीईओचा पगार आहे दिवसाला ४८ कोटी रुपये

Highest Paid CEO : क्वांटमस्केप नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली आहे. 

137
Highest Paid CEO : भारतीय वंशाच्या या सीईओचा पगार आहे दिवसाला ४८ कोटी रुपये
Highest Paid CEO : भारतीय वंशाच्या या सीईओचा पगार आहे दिवसाला ४८ कोटी रुपये
  • ऋजुता लुकतुके

जगातील सगळ्यात जास्त पगार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? असा प्रश्न समोर आला तर आपण गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांच्या वेबसाईटवर जातो आणि त्यांच्या सीईओंचे पगार तपासून पाहतो. कारण, आघाडीच्या या टेक कंपन्या रग्गड पगार देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांचे पगार आहेतही गलेलठ्ठ. तर टेस्ला कंपनीचे एलॉन मस्कही त्यांच्या कंपनीचे सीईओ आहेत. पण, सध्या सर्वाधिक पगार घेणारा सीईओ आहे तो जगदीप सिंग हा आणखी एक भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक. क्वांटमस्केप या टेक कंपनीचे ते सीईओ होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि सध्या ते एका नवीन स्टार्टअपचे सीईओ आहेत. पण, त्यांनीच स्थापन केलेल्या या दोन कंपन्यांमधून त्यांना दिवसाला ४८ कोटी रुपये आणि वर्षाला तब्बल १७,००० कोटी रुपये इतका मोबदला मिळतो. (Highest Paid CEO)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy : बोर्डर – गावसकर मालिकेच्या बक्षिस समारंभात बोर्डर होते, मग गावसकर का नव्हते?)

जगदीप सिंग हे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. तसे सध्या अमेरिकेत राहत आहेत. त्यांनी २०१० मध्ये क्वांटमस्केप नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सॉलिड-स्टेट बॅटरीवर काम करते. त्यांच्या बॅटरीने ईव्ही उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. चार्जिंगचा वेळ कमी करणे आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे ही त्यांच्या बॅटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत. कल्पकतेच्या क्षेत्रातील अशा योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. जगदीप सिंगच्या यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे. यानंतर त्यांनी अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी स्वत:ची कंपनीही सुरु केली आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि दूरदृष्टीने क्वांटमस्केपला केवळ एक यशस्वी व्यवसायच नाही तर तंत्रज्जानाच्या नवनिर्मितीच्या क्षेत्रात मोठं नाव केलं आहे. (Highest Paid CEO)

जगदीप सिंग यांची कंपनी क्वांटमस्केप २०२० मध्ये शेअर बाडारात सूचीबद्ध झाली. गुंतवणूकदारांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे कंपनीचे मूल्यांकन झपाट्याने वाढले. सिंग यांच्या पगाराच्या पॅकेजमध्ये २.३ अब्ज डॉलर किमतीचे समभाग समाविष्ट होते. ज्यामुळे त्यांचा वार्षिक मोबदला सुमारे १७,५०० कोटी रुपये होता. हा पगार जगात सर्वात जास्त पगार आहे. (Highest Paid CEO)

फेब्रुवारी २०२४ मध्ये, जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली होती. मात्र, या निर्णयानंतरही त्यांचा प्रवास थांबला नाही. सध्या ते एका ‘स्टेल्थ स्टार्टअप’चे सीईओ आहेत आणि भविष्यातील तंत्रज्जनावर काम करत आहेत. (Highest Paid CEO)

(हेही वाचा- Prof. Sanjay Mandlik यांना विधान परिषदेवर संधी द्या; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी)

जगदीप सिंग यांच्याशी संबंधित माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (@startupjag) उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते पुन्हा एकदा अशा प्रकल्पांवर काम करत आहेत जे भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. त्याचा नवा स्टार्टअप अजूनही गुपित आहे, पण त्याचे भूतकाळातील काम आणि दूरदृष्टी पाहता, त्याचे पुढचे पाऊलही उत्तम असेल हे स्पष्ट होते. (Highest Paid CEO)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.