मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे (Highway Closed) राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज आज पहाटे कोसळला. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या पुलाचा मध्यभाग ढासळल्याने इंदौर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथे वळवण्यात आली आहे.
या पुलाची मुदत संपली असल्याने पुलाचे काही दिवसांपूर्वीच स्ट्रक्चर ऑडिट झाले होते, मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. यामुळे मातीचा असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्यासहित कोसळला. यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
(हेही वाचा – Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक )