देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे (Highway) काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशात अपघातही वाढले आहेत. याबाबत चिंता व्यक्त करत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ते अपघातांना आळा बसणार आहे. यामुळे होणारे अपघात टाळता येऊ शकतात. या नव्या नियमानुसार दर १० किलोमीटरवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत.
(हेही वाचा नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक)
फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणाऱ्या नियमानुसार द्रुतगती मार्ग (Highway) आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर फलक लावले जातील. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की, सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्त्यावरील चिन्हे आणि चिन्हे अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रत्येक वाहनचालकाला रस्त्याची भाषा अवगत असावी. या कारणास्तव, रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्त्यांच्या मालकीच्या कंपन्यांसाठी नियम जारी केले आहेत यात प्रत्येक १० किमी अंतरावर फूटपाथवर वाहनांच्या वेगाची माहिती देणे बंधन कारक करण्यात आले आहे. एनएचएआयने यासंदर्भात सांगितले आहे की, वाहनांची स्पीड लिमिट प्रत्येक ५ किमीवर लिहावी लागेल. यासोबतच महामार्ग (Highway) आणि एक्स्प्रेस वेच्या मालकीच्या कंपन्यांना वाहनचालकांना सूचना देण्यासाठी दर ५ किमीवर नो पार्किंगचे संकेत बसवावे लागतील. प्रत्येक ५ किमी अंतरावर आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक लिहावा लागेल, असेही या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community