वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गावरील FASTag द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल वसुली 50 हजार 855 कोटी रुपये झाली आहे, जी 2021 मध्ये 34 हजार 778 कोटी होती, ही वसुली सुमारे 46 टक्क्यांनी वाढली आहे. अशी वसुली कायम वाढत राहिल्यास 2024 च्या अखेरीस FASTags द्वारे भारतात टोल वसुली १ लाख कोटी पेक्षा जास्त असेल. डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर FASTag द्वारे सरासरी दैनंदिन टोल संकलन 134.44 कोटी रुपये होते आणि 24 डिसेंबर 2022 रोजी एका दिवसातील सर्वाधिक वसुली 144.19 कोटी रुपये झाली.
2022 मध्ये FASTag व्यवहारांची संख्या 324 कोटी
त्याचप्रमाणे, FASTag व्यवहारांची संख्या देखील 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 48 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 आणि 2022 मध्ये FASTag व्यवहारांची संख्या अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी होती. आजच्या तारखेपर्यंत 6.4 कोटी FASTags जारी करण्यात आल्याने, देशभरातील FASTag शुल्क प्लाझांची एकूण संख्या देखील 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग शुल्क प्लाझांसह) झाली आहे, जी मागील वर्षी 2021 मध्ये 922 होती.
(हेही वाचा स्वीडननंतर नेदरलँडमध्येही जाळले कुराण; मुस्लिम राष्ट्रांकडून नाराजी व्यक्त)
29 वेगवेगळ्या राज्य संस्था/अधिकारींसोबत समंजस्य करार
तसेच, FASTag कार्यक्रमांतर्गत ऑन-बोर्डिंग स्टेट फी प्लाझासाठी 29 वेगवेगळ्या राज्य संस्था/अधिकारींसोबत समंजस्य करार करण्यात आले आहेत, ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे. “FASTag अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय महामार्गावर फी प्लाझातील प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. महामार्गावरून जाणाऱ्यांमध्ये FASTag वापरकर्त्यांची सतत वाढ झाली आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.