कर्नाटकमधील उमेदवारांना स्पर्धात्मक आणि भरती संबंधित परीक्षांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री एम. सी. सुधाकर यांनी केली आहे. (Hijab In Examinations) ‘हिजाबचा मुद्दा चर्चेचा भाग नव्हता. काहींना छोट्या छोट्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा आहे; परंतु आम्ही लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. नीटमध्ये देखील उमेदवारांना हिजाब (Hijab) घालण्याची परवानगी आहे,’ असे मंत्र्यांनी सांगितले. राज्याचे शैक्षणिक धोरण आणि रिक्त पदे भरण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी झालेल्या बैठकीनंतर सुधाकर यांची प्रतिक्रिया आली. त्या वेळी ते बोलत होते. (Hijab In Examinations)
(हेही वाचा – Asian Para Games 2023 : दुसऱ्या दिवशीही भारताची पदकांची लूट, ४ सुवर्णांसह एकूण १८ पदकं खिशात)
उडुपीतील पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. ११ दिवस चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे अत्यावश्यक नसल्याचे जाहीर करत हिजाबवरील बंदी कायम ठेवली, या पार्श्र्वभूमीवर सुधाकर यांनी हा निर्णय दिला आहे.
‘मला वाटते, जे लोक विरोध करत आहेत, त्यांनी नीट परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पडताळणी केली पाहिजे. मला माहीत नाही की, ते यातून मुद्दा का काढत आहेत. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोक त्यांना हवे तसे कपडे घालण्यास मोकळे आहेत, सुधाकर यांनी स्पष्ट केले. (Hijab In Examinations)
हा निर्णय इतर संस्थांसह ५ महामंडळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी कर्नाटकात होणाऱ्या परीक्षांनाही लागू होईल, असे समजते. मागील वर्षी उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या ६ मुलींना वर्गात जाण्यापासून रोखल्यानंतर मुलींनी विरोध केला होता. त्याचा उद्रेक कर्नाटकात झाला होता. काही हिंदू विद्यार्थ्यांनीही (Hindu Students) भगवा स्कार्फ घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. (Hijab In Examinations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community