देशांतील बहुतांश राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. 60 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो 150 रुपये किलोच्याही पुढे गेला. टोमॅटोबरोबरच मिरची, आलं यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामधून थोडासा दिलासा मिळाल्यासारखे वाटत होते, मात्र याच दरम्यान आणखी एक मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन यामुळे सफरचंदाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सफरचंदाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान 20 ते 25 % वाढ होऊ शकते. याविषयी एका खरेदीदाराने सांगितले की, ‘गेल्या आठवड्यात सफरचंदाच्या किमती वाढल्या आहेत. मी आधी 150 रुपये किलोने शिमला सफरचंद विकत घ्यायचो. आता ते 180 रुपये किलोने विकले जात आहेत.’ तसेच साधारणपणे जास्त सफरचंद बाजारात आले की, त्याचे भाव उतरू लागतात, पण यावर्षी सफरचंदाची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.
सफरचंदांचा बहुतांश पुरवठा शिमल्यातील रोहरू, कुल्लू-मनालीचा काही भाग आणि जम्मू-काश्मीरसारख्या भागातून होतो. एका सफरचंद घाऊक विक्रेत्याने सांगितले की, “हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत आणि फळांचे नुकसान झाले आहे. सफरचंद घेऊन जाणारे अनेक टेम्पो वाटेत अडकले, त्यामुळे अनेक फळे सडली. त्यामुळे बाजारपेठेतील पुरवठा कमी झाला आहे.
(हेही वाचा – Talathi Paper Leak : नाशिकमध्ये वॉकीटॉकीद्वारे फोडला तलाठी परीक्षेचा पेपर; एकाला अटक)
घाऊक बाजारात 25-26 किलो शिमला सफरचंदांचा क्रेट जो गेल्या वर्षी 2,800 रुपयांना विकला गेला होता, तो आता 3,500 रुपयांना विकला जातो. सफरचंदाचे विक्रेते विनायक काची सांगतात की, ‘मला खात्री आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सफरचंदांची आवक कमी होईल, त्यामुळे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. सफरचंद खराब होऊ नये म्हणून शेतकरी पॅकेजचा आकार कमी करत आहेत आणि कापणीच्या वेळी पुरवठा करत आहेत.’ रॉयल गाला जातीचे सफरचंद 25 किलोच्या बॉक्समध्ये विकत मिळायचे. यंदा 10 किलोचे रॉयल गाला बॉक्स जास्त किमतीत उपलब्ध आहेत.
कोंढवा येथील एक रहिवासी गिरिजा याविषयी सांगतात की, ‘मी सहसा ऑनलाइन फळे खरेदी करते. हिंदस्थानी सफरचंद 600 ग्रॅमसाठी 240-250 रुपये दराने विकले जात होते,तर पूर्वी याच प्रमाणात 180-200 रुपये होते. फळांची कमी उपलब्धता असल्याने केळीच्या दरातही वाढ झाली आहे. सणासुदीच्या सुरुवातीलाच भाव वाढले तर अवघड होईल.’
हिमाचलमधील शेतकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांनी सांगितले की, वाहतुकीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पुना फळे पुरवठादार इस्माईल चौधरी म्हणतात की, लोकं सफरचंद मोठ्या प्रमाणात खरेदी करत नसल्यामुळे व्यवसाय मंदावला असल्याची माहितीही विक्रेत्यांनी दिली आहे.
सफरचंद बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
हिमाचल प्रदेशातील रस्ते बंद आणि खराब हवामानामुळे वाहतूक खर्च प्रति बॉक्स 20-25 रुपयांनी वाढला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंद बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे कापणीचा हंगाम सुरू असताना उत्पादकांना सफरचंदावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाटत आहे. कडक हिवाळा आणि अचानक आलेल्या पावसामुळे सफरचंदाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
हेही पहा –