Himachal Landslide : हिमाचल प्रदेशातील कुल्लू (Kullu) जिल्ह्यातील मणिकरण येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले, यामध्ये ६ जणांचा (३ महिला आणि ३ पुरुष) जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. हा अपघात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. तसेच गुरुद्वारासमोर रस्त्याच्या कडेला अनेक लोक बसले होते. यावेळी भूस्खलना (Landslide) दरम्यान, टेकडीवरून मोठ्या प्रमाणात ढिगारा पडला, त्यासोबत एक झाडही कोसळले. तसेच अनेक लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. (Himachal Landslide)
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला असलेला फेरीवाला, एक टाटा सुमो कार आणि तीन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. कुल्लूचे एडीएम अश्वनी कुमार (Kullu ADM Ashwani Kumar) म्हणाले की, मणिकरण गुरुद्वारा (Manikaran Gurdwara landslide) पार्किंग लॉटजवळ झाड कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
(हेही वाचा – चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर Gwadar Port मच्छिमारांचे जीवन कसे उद्ध्वस्त करत आहे? वाचा सविस्तर…)
घटनास्थळी बचावकार्य सुरू
या घटनेत जखमी (Himachal injured patient) झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच त्या ठिकाणी ही घटना घडली तेथे बचावकार्यही सुरू आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार मणिकर्ण गुरुद्वाराजवळ आधी भूस्खलनाची घटना घडली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community