Himachal Pradesh Earthquake: हिमाचल प्रदेश भूकंपाने हादरले, ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

302
Assam Earthquake : मोरीगावमध्ये ५.० तीव्रतेचा भूकंप, गुवाहाटीतही जाणवले भूकंपाचे धक्के
Assam Earthquake : मोरीगावमध्ये ५.० तीव्रतेचा भूकंप, गुवाहाटीतही जाणवले भूकंपाचे धक्के

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गुरुवारी सायंकाळी ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के संपूर्ण उत्तर प्रदेशासह ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या मनाली शहरातही जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने यासंदर्भात माहिती दिली आहे. (Himachal Pradesh Earthquake)

चंदीगड, पंजाब, हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागांत
गुरुवारी रात्री ९.३४ वाजता चंबामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपानंतर आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही. यापूर्वी गेल्यावर्षी 1 एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील चमोली आणि लाहौल आणि स्पिती येथे कमी तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हिमाचल प्रदेशात 10 किमी खोलीवर होता. या भूकंपाचे धक्के उत्तर भारताच्या अनेक भागात जाणवले. चंदीगड, पंजाब आणि हरियाणातील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले.

(हेही वाचा – Mumbai Crime : बोगस जामीनदारांची टोळी उदध्वस्त, शेकडो आरोपींना बोगस जामीन देऊन काढले तुरुंगातून बाहेर)

जीवितहानी नाही
चंदीगड येथील रहिवासी संजय कुमार म्हणाले, “मला काही सेकंदांसाठी तीव्र धक्का बसला. मी इमारतीतून खाली धावणारच होतो, तेव्हा भूकंपाचे धक्के थांबले.1905 मध्ये  हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे 8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड मृत्यू आणि विध्वंस झाला होता. एन. सी. एस. च्या नोंदींनुसार, पश्चिम हिमालयातील आपत्तीमध्ये त्यावेळी 20,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. (Himachal Pradesh Earthquake)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.