Himachal Snowfall: अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद; ‘या’ 3 राज्यांसाठी अती हिमवृष्टीचा इशारा

166
थंडीच्या दिवसात बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने जम्मू काश्मीर, श्रीनगर सारख्या ठिकाणी जात असतात. मात्र प्रचंड बर्फवृष्टीमुळे डोंगरात प्रदेशात सध्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुट्टीचा आनंद विस्कळीत होऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या तीन राज्यांमध्ये बर्फवृष्टी (snowfall) होत आहे. दरम्यान, रविवारीही येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. (Himachal Snowfall)

राज्यात नागरिक अवकळी पाऊस, गारपीट आणि थंडीने हैराण झाले असताना, देशाच्या उत्तरेकडील जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात येत्या काही दिवसात अती बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 8 इंच, गांदरबलमध्ये 7 इंच, सोनमर्गमध्ये 8 इंच बर्फवर्षावाची नोंद करण्यात आली आहे. तर पहलगाममध्ये 18 इंच बर्फ पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 
श्रीनगर-जम्मू महामार्गही बंद आहे. 1200 हून अधिक वाहने येथे अडकली आहेत. खराब हवामानामुळे शनिवारी श्रीनगर विमानतळावरून एकाही विमानाने उड्डाण केले नाही. रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) शनिवारी रात्री बर्फाचे वादळ आले. रोहतांगच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर २४ तासांत ३ फुटांपेक्षा जास्त बर्फ जमा झाला आहे. अटल बोगद्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

(हेही  वाचा – South Korean Plane Crash: विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, ८५ प्रवासी ठार)

मध्य प्रदेशातील (Heavy rain in Madhya Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. भोपाळमध्ये शनिवारी १७ मिमी (पाच इंच) पावसाने नवा विक्रम केला. डिसेंबरमध्ये एकाच दिवसात 5 वर्षानंतर झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.