छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाईम्स ऑफ इंडिया जवळील पादचारी पूल उद्घाटनाशिवाय नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी खुले करून दिले असले तरी या पुलाच्या बांधकामाचा खर्च दीड कोटींनी वाढला गेला. मात्र या पुलाचे बांधकाम अर्धवट असून सरकत्या जिन्याच्या बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. परंतु या अर्धवट काम असतानाच याचा खर्च दीड कोटींनी वाढला गेला आहे. (Himalay Pool)
पूल कोसळून ७ पादचाऱ्यांचा झाला होता मृत्यू
मुंबईतील या हिमालय पुलाचा भाग १४ मार्च २०१९ रोजी कोसळून मोठी दुर्घटना ७ पादचारी रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ३३ जण जखमी झाले होते. या पुलाचे योग्यप्रकारे ऑडीट न करता वापरास खुले करून दिल्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीटर डि. डि. देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले होते. तसेच महापालिकेचे निवृत्त पूल विभागचे प्रमुख अभियंता व निवृत्त उपप्रमुख अभियंता यांच्यासह इतर अभियंत्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आले होते. (Himalay Pool)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रेल्वे प्रवाशांना होत होता त्रास
हा पादचारी पूल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पादचारी पुलाला जोडलेला असल्यान रेल्वे प्रवाशांसाठी तो अत्यंत सोयीचा ठरतो. या पुलाच्या दुघर्टनेनंतर रेल्वे प्रवाशांना डि. एन. रोड वरून टाईम्स ऑफ इंडिया, कामा रुग्णालय, सेंट झेवियर्स कॉलेज, जे. जे. कला महाविद्यालय व आसपासच्या कार्यालयांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांना येता-जाता प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. (Himalay Pool)
(हेही वाचा – Skill Development Center : महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र)
साडेसात कोटींच्या खर्चाला मंजुरी
तसेच या पुलाअभावी डि. एन. रोडवरही वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने हे पूल तातडीने बांधण्याची मागणी होत बसल्याने त्यामुळे रखडलेल्या या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने पिनाकी इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स यांची निवड करून एकूण ७ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. (Himalay Pool)
म्हणून झाली खर्चात वाढ
मात्र, हे बांधकाम सुरु झाल्यानंतर मध्य रेल्वेने पादचारी पुलाची रुंदी वाढवणे, पुलाला सरकते जिने बसवण्याची सूचना केली. त्यामुळे या पुलावरील पादचाऱ्यांची वाढती संख्या आणि तसेच मध्य रेल्वेने केलेल्या मागणीचा विचार करता महापालिकेने या पुलाच्या आराखड्यात बदल केला. त्यामुळे हिमालय पुलाच्या बांधकामाच्या खर्चात विविध करासंह दीड कोटींची वाढ झाली असून जिथे साडेसात कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती, तिथे हा खर्च हा ९ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. (Himalay Pool)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community