- ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजार नियामक संस्था अर्थात सेबीचे अध्यक्ष माधवी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी हिंडेनबर्गने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. अदानी समूहात ज्या परदेशी कंपन्यांमधून गुंतवणूक होते, त्यातील काही कंपन्यांमध्ये माधवी पुरी-बूच आणि पती धवल बूच यांची भागिदारी असल्याचे आरोप हिंडेनबर्ग या अमेरिकन संशोधन संस्थेनं केले आहेत. ते बूच दांपत्याने सध्या फेटाळले आहेत. (Hindenburg Research Report)
अदानी समुहाशी संबंधित कंपन्यांमध्ये बूच यांनी केलेली गुंतवणूक ही ते सिंगापूरमध्ये राहत असताना आणि सेबीशी संबंध नसताना केलेली आहे. सिटी कॉर्प या वित्तीय संस्थेशी निगडित मित्र अनिल आहुजा यांच्या सल्ल्याने ती गुंतवणूक तेव्हा केली होती. त्यामुळे वैयक्तिक हितसंबंधांचा यात संबंधच येत नाही, असा दावा बूच यांनी केला आहे. इतकंच नाही तर अनिल आहुजा यांनी सिटी कॉर्प कंपनी २०१८ मध्ये सोडल्यानंतर बूच यांनीही ती गुंतवणूक काढून घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे. २०१८ मध्येच माधवी पुरी-बूच या सेबीच्या अध्यक्ष झाल्या. (Hindenburg Research Report)
(हेही वाचा – #independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?)
यामुळे अदानी समुहही सापडला कचाट्यात
बूच यांनी दिलेल्या या उत्तरानंतर हिंडेनबर्गनेही त्याला उत्तर दिलं आहे. धवल बूच यांची ९९ टक्के गुंतवणूक अजूनही तशीच असल्याचं म्हटलं आहे. सेबी या नियामक संस्थेच्या अध्यक्ष असताना तुम्ही किंवा तुमचे निकटचे कुटुंबीयंही शेअर बाजार किंवा कंपन्यांमध्ये अशाप्रकारची गुंतवणूक करू शकत नाहीत. असं असताना माधवी बूच आणि त्यांच्या पतींनी अशी गुंतवणूक केल्याचं दिसताच भारतात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अदानी समुहही कचाट्यात सापडला आहे. (Hindenburg Research Report)
माधवी बूच यांनी भारत व सिंगापूर इथं दोन कन्सल्टिंग कंपन्या स्थापन केल्या होत्या. आणि यात अदानी समुहाची गुंतवणूक होती. तसंच या कंपन्यांची गुंतवणूकही अदानी समूहाच्या शेअरमध्ये होती. पण, २०१७ मध्ये या कंपन्या मृत झाल्याचा दावा माधवी बूच यांनी केला आहे. त्यांचे पती धवल बूच यांनी २०१९ मध्ये नवीन उद्योग सुरू करण्याच्या हेतूने कंपन्या पुन्हा सुरू केल्या. अदानी समुहाशी कंपन्यांचा काहीही संबंध नाही, असा त्यांचा दावा आहे. (Hindenburg Research Report)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community