Hindenburg Research Shutdown : हिंडेनबर्ग नेमकी कशामुळे बंद होतेय, ट्रम्प सरकारची भीती की शॉर्ट सेलिंगचे निर्बंध?

Hindenburg Research Shutdown : संस्थापक नॅथन अँडरसनने वैयक्तिक ताणतणावांचं कारण दिलं आहे. 

73
Hindenburg Research Shutdown : हिंडेनबर्ग नेमकी कशामुळे बंद होतेय, ट्रम्प सरकारची भीती की शॉर्ट सेलिंगचे निर्बंध?
  • ऋजुता लुकतुके

शेअरमधील शॉर्ट सेलिंग करणारी अमेरिकेतील एक संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने गुरुवारी अचानक आपण कंपनी बंद करत असल्याची घोषणा केली आहे. संस्थापक अँडरसनने कामाचा ताण आणि त्यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचं कारण दिलं असलं तरी खऱ्या कारणावरूनही चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प प्रशासन सुरू होत असतानाच ही घोषणा झाल्यामुळे कारण, राजकीय आहे, शेअर नियामक संस्थांचं आहे की वैयक्तिक आहे असे प्रश्नही विचारले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नॅथन अँडरसनने २०१७ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. १९३७ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिंडेनबर्ग नावाचं एक विमान समुद्रात कोसळून बुडलं होतं. विमानाच्या हायड्रोजन फुग्याला आग लागून हा अपघात घडला आणि यात ३५ जणांचा जीव गेला. विमानाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी विमानात घेतल्याचं नंतर स्पष्ट झालं. या उदाहरणानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात होणारे गैरव्यवहार हा अँडरसनचा जिव्हाळ्याचा विषय बनला. त्याने आपल्या कंपनीचं नावही हिंडेनबर्ग असंच ठेवलं. (Hindenburg Research Shutdown)

(हेही वाचा – Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू)

त्याची स्वत:ची कंपनी शॉर्ट सेलिंगवर भर देते. म्हणजेच शेअर खाली जाणार असं गृहित धरून ती त्यात गुंतवणूक करते. आणि या कंपनीने बाहेर आणलेले अनेक अहवाल हे कंपन्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरले आहेत. किंवा त्या शेअरमध्ये काही दिवसांसाठी मोठी घसरण झाली आहे.

२०२३ साली हिंडेनबर्गने अदानी समुहावरही अकाऊंट्समध्ये गैरव्यवहार आणि शेअरच्या किमतीत कृत्रिम फुगवटा निर्माण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अदानी समुहाला १०० अब्ज अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. तेव्हा ही कंपनी भारतात प्रकाशझोतात आली. पण, त्यापूर्वीच कंपनीने अमेरिकेतही असेच काही गंभीर अहवाल सादर केलेले आहेत. निकोला कॉर्पोरेशन, इकान इन्व्हेस्टमेंट्स, हे त्यांचे इतरही दोन अहवाल गाजले होते आणि त्यांचा त्या कंपन्यांना फटकाही बसला. (Hindenburg Research Shutdown)

आता नॅथन अँडरसनने कंपनी बंद करताना वैयक्तिक कारण दिलं आहे. ‘मी अनेक कंपन्यांची पोलकोल केली. त्यासाठी आयुष्य दिलं. पण, त्या नादात माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं आहे. माझं आयुष्य कायम तणावाखाली गेलं आहे. आता ते थांबवण्याची वेळ आली आहे. आपली मोहीम आम्ही फत्ते केली आहे,’ असं अँडरसनचं म्हणणं आहे.

(हेही वाचा – Indian Cricket Team : भारतीय संघाला अखेर मिळाले फलंदाजीचे प्रशिक्षक, सितांशू कोटक यांची वर्णी)

पण, जाणकारांना यात आणखीही काही कारणं दिसतात,

१. हिंडेनबर्ग कंपनी मुख्यत्वे शॉर्ट सेलिंगमधून पैसे मिळवते आणि या रणनीतीवर अमेरिकन नियामक संस्था सध्या जास्त लक्ष ठेवून आहेत. त्यांची संभाव्य चौकशी टाळण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

२. शॉर्ट सेलिंगचे अमेरिकन नियमही अलीकडे कडक झाले आहेत. त्यामुळे हिंडेनबर्गला काम करणं कठीण जात आहे.

३. हिंडेनबर्गने ज्यांच्या विरोधात अहवाल सादर केले त्या कंपन्या अनेकदा हिंडेनबर्ग विरुद्ध कायदेशीर खटले दाखल करतात. त्यात कंपनीचे श्रम, पैसा वाया जातो. त्या दडपणामुळेही कंपनीने हा निर्णय घेतला असावा.

४. अमेरिकन राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीपासून कार्यभार स्वीकारणार आहेत. ते स्वत: उद्योजक आहेत आणि त्यांनी ट्रम्प मीडिया कंपनीतून शेअरची विक्री केलेलं प्रकरणही अमेरिकेत वादात सापडलं होतं. अशावेळी त्यांनी कारभार हातात घेतल्यावर ते विरोधकांविरुद्ध पाश आवळू शकतात आणि हिंडेनबर्ग यांची काम करण्याची पद्धत ही मूळातच ट्रम्प यांना रुचणारी नाही. त्यामुळेही अँडरसन यांनी हा निर्णय घेतला असावा असं बोललं जातंय. (Hindenburg Research Shutdown)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.