अदानींवर आरोप करणाऱ्या Hindenburg चे दुकान बंद

31
अदानींवर आरोप करणाऱ्या Hindenburg चे दुकान बंद
अदानींवर आरोप करणाऱ्या Hindenburg चे दुकान बंद

गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीवर गंभीर आरोप करणाऱ्या अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने (Hindenburg) कामकाज अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपनीवर हिंडनबर्गने गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शेअर बाजारात अदानी समूहाला मोठा फटका सहन करावा लागला होता. मात्र आता हिंडनबर्गचे संस्थापक एंडरसन (Anderson) यांनी ही रिसर्च फर्म बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला आहे. (Gautam Adani)

( हेही वाचा : दिल्ली विधानसभेसाठी Ajit Pawar यांच्याकडून राष्ट्रवादीच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

हिंडनबर्गचे (Hindenburg) संस्थापक एंडरसन (Anderson) यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. हिंडनबर्गने (Hindenburg) जे लक्ष्य ठेवले होते, ते आता पूर्ण केले आहे. अनेक दिवसांपासून ही फर्म बंद करण्याची तयारी करण्यात येत होती. पण एका योजनेवर आमचे काम सुरू होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हिंडनबर्ग कंपनीच्या प्रवासाबद्दल एंडरसन म्हणाले की, ज्यावेळी ही शॉर्ट सेलर फर्म सुरू करायची होती. त्यावेळी ना पैसे होते ना कोणती यंत्रणा. पण हिंडनबर्ग सुरू झाली. त्यावेळी कंपनीवर तीन खटले सुरू होते. या कोर्टकचेरीतच पैसे खर्च व्हायचे. पण या कंपनीला वकील ब्रायन वूड यांनी मदत केली आणि कंपनीने उभारी घेतली. (Anderson)

दरम्यान हिंडनबर्ग (Hindenburg) अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गकडे सध्या ११ सदस्य आहेत. आता ही टीम काय करणार असा सवाल विचारण्यात येत आहे. तर हे सदस्य त्यांची आर्थिक संशोधन संस्था सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे. समारोपीय भाषणात एंडरसन (Anderson) यांनी पत्नी, कुटुंब, मित्र, सदस्य आणि समर्थकांचे आभार मानले. (Hindenburg)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.