Tamil Nadu मध्ये पुन्हा हिंदीद्वेष; मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा हिंदीला विरोध; केंद्र सरकारच्या विरोधात भाषिक युद्धाचा इशारा

30

जर केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्हीही पूर्ण तयार आहोत. तमिळनाडूत फक्त तमिळ (Tamil) आणि इंग्रजी वापरली जाईल. हिंदी लादण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, त्याचा आम्ही तीव्र विरोध करू, अशी फुटीरतावादी भाषा तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली आहे.

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडने यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी (Hindi) लादण्याविरोधात आंदोलन केल्याचे दाखलेही स्टॅलिन यांनी या वेळी दिले. (hindi hatred in tamil nadu)

(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकरांच्या वृक्षप्रेमाची साक्ष, नाशिकचा निंबोणी वृक्ष)

भारताच्या दक्षिणेकडील राज्य तमिळनाडूत भाषा वाद उफाळला आहेत. केंद्र सरकारच्या त्रिभाषिक धोरणामुळे राज्य आणखी एका भाषिक युद्धाच्या दिशेने जाते, असा आरोप तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M.K. Stalin) यांनी केला आहे. तमिळनाडूत नेहमी तमिळ आणि इंग्रजी चालेल. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.

केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी नुकताच दिला आहे.

स्टॅलिन यांच्यावर भाजपाचा पलटवार

तमिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई (Annamalai) यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर पलटवार केला आहे. द्रमुकच्या भाषा धोरणात ढोंगीपणा आहे. आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाही, असे मुख्यमंत्री सांगतात मात्र तमिळनाडूत (Tamil Nadu) सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकण्याची संधीही दिली जात नाही. खासगी शाळांमध्ये ही सुविधा आहे. मग जर तुम्हाला तिसरी भाषा शिकायची असेल, तर द्रमुकच्या नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या सीबीएसई खासगी शाळांमध्येच मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे, का असा सवाल अन्नामलाई यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.