हिंदुत्ववादी कार्यकर्ते Dharmendra Mudaliar उपाख्य स्वामी धर्मानंद सरस्वती यांचे निधन

206
हिंदुत्ववादी कार्यकर्ते Dharmendra Mudaliar उपाख्य स्वामी धर्मानंद सरस्वती यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, हिंदू मानवाधिकार मंचाचे सक्रीय कार्यकर्ते धर्मेंद्र मुदलियार (Dharmendra Mudaliar) यांचे २३ जून २०२४ रोजी हेरंज, नडियाड येथील आश्रमात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. धर्मेंद्र मुदलियार हे संगणक अभियंता होते. अनेक मोठमोठ्या संगणक प्रकल्पांसाठी त्यांनी आपले योगदान दिले होते. (Dharmendra Mudaliar)

आपल्या व्यवसायात यशस्वी असणारे धर्मेंद्र मुदलियार (Dharmendra Mudaliar) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि हिंदू मानवाधिकार मंचाचे सक्रिय कार्यकर्ते होते. हिंदुंवर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं काम हिंदू मानवाधिकार मंच ही संस्था करते. अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला झाला होता, तेव्हा त्याविरोधात निदर्शनामध्ये धर्मेंद्रजी यांनी पुढाकार घेतला होता. मिरज दंगलीचे सत्यशोधन करण्याच्या प्रतिनिधी मंडळातही त्यांचा सहभाग होता. (Dharmendra Mudaliar)

(हेही वाचा – मुंबईतील Cement Concrete Roads कामांची होणार ‘कोअर टेस्ट’)

विविध सामाजिक व राष्ट्रीय कार्यात त्यांनी भाग घेतला. अध्यात्माची आसक्ती असल्यामुळे या प्रतिथयश अभियंत्याने संन्यास घेतला. स्वामी असंगानंद सरस्वती यांच्याकडून धर्मेंद्रेजी यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि स्वामी धर्मानंद सरस्वती म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मालाड येथील बाद्रन नगरमध्ये त्यांचा निवास होता. अनेक काळापासून ते आजारी होते. २३ जून २०२४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. एक अस्सल हिंदुत्वाचा कार्यकर्ता हरपला. (Dharmendra Mudaliar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.