Dharavi मध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या; अंत्ययात्रेवरही दगडफेक; परिसरात तणावाचे वातावरण

1306

बजरंग दलचा कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या हत्येमुळे धारावीत (Dharavi) तणाव निर्माण झाला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री धारावी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी आरोपी नियाज शेख (अल्लू) आणि आरिफ यांच्याविरुद्ध धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदचा भाऊ शैलेंद्र कुमार वैश्य यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आमदार राम कदम यांनी केली आहे.

(हेही वाचा ज्याला स्वत:ची जात माहीत नाही, ते जातीय जनगणनेची मागणी करतायेत; खासदार Anurag Thakur यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)

धारावीत दगडफेक 

अरविंद कुमार वैश्य (26) हे मेडिकलच्या दुकानात काम करायचे. त्यांच्या मिळकतीतून घरखर्च भागवला जात होता,  मात्र वाद मिटवण्यासाठी ते धारावी (Dharavi) पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी आरोपींनी त्यांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास धारावी पोलीस करत आहेत. मंगळवार, ३० जुलै रोजी अरविंद यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती, त्यासाठी १ हजार ते दीड हजार हिंदुत्वनिष्ठ जमले होते. या अंत्ययात्रेवर एका इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर धारावी (Dharavi) परिसरात दगडफेक आणि दुकानांची तोडफोड झाली. पुढे पोलिस बंदोबस्तात अरविंद यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. या भागातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन दादर आणि शिवाजी पार्क येथील पोलीस फौज धारावी येथे वळवण्यात आली आहे.

विहिंप प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकारादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या लाठीहल्यात बजरंग दलाचे चार कार्यकर्ते जखमी झाले. करण पटेल, रुपेश गाली आणि इतर दोघे अशा चार जखमींना सायन इस्पितळात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांची भूमिका संशयास्पद आणि जिहादींना सहकार्य करण्याची दिसून आली. त्यामुळे गृहखात्याने प्रशासनात बसलेले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते शोधून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असे मोहन सालेकर यांचे म्हणणे आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही दगडफेक धारावी येथील ड्रग माफिया आणि गुंडानी केल्याचे X पोस्टमध्ये म्हटले आहे. “मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. पोलिसांनी या परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून संबंधितावर कारवाई करावी,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.