Nashik मध्ये हिंदूंच्या बंदला गालबोट; आंदोलकांवर दगडफेकीमुळे तणाव

216
Nashik मध्ये हिंदूंच्या बंदला गालबोट; आंदोलकांवर दगडफेकीमुळे तणाव
Nashik मध्ये हिंदूंच्या बंदला गालबोट; आंदोलकांवर दगडफेकीमुळे तणाव

नाशिकमध्ये (Nashik) हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला दगडफेकीचे गालबोट लागले. मेम रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात हिंदूंच्या बंदवर दगडफेक करण्यात आली. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी १६ ऑगस्ट रोजी नाशिक बंदची हाक दिली होती. या वेळी दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – शहरी भागात बचतगटांची संख्या वाढवावी; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

दुकानदारांनी बंदला केला विरोध

नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. सकल हिंदू समाजाकडून (Sakal Hindu Samaj) बांगलादेशात हिंदूंवर (Bangladeshi Hindus Protest) झालेल्या अत्याच्यारांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचे आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला. बांगलादेशात हिंदूंच्या विरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला.

पोलिसांनी तातडीने भद्रकालीत येणारी वाहने बॅरेकेड्स लाऊन अडविली. मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रविवार कारंजा येथे जमाव रस्त्यावर आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कुमक तेथे पोहोचली. युवकांना पांगविण्यात आले. Nashik शहरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव जखमी

नाशिक येथे बडी दर्गा परिसरात झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव जखमी झाले. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना देखील दगडफेकीत मार लागला. या दगडफेकीदरम्यान पिंपळपार चौक परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार देखील करण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.