छत्तीसगडमधील कोरबा येथून मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ताजिया मिरवणुकीच्या प्रसंगी एका हिंदू (Hindu) अल्पवयीन मुलाला जिवंत पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या भावालाही आगीत टाकण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुलांचे दुसऱ्या धर्मातील मुलांशी काही कारणावरून भांडण झाले. त्यावेळी त्या मुलांनी या दोन मुलांना आगीत ढकलले.
ही घटना कोरबातील करतला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॉनबिरा गावात घडली. याठिकाणी मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आल्याने दोन तरुण त्यांच्या दुकानात बसले होते, असे सांगण्यात आले. यावरून काही तरुणांनी येथे येऊन त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हल्ला करणाऱ्या मुलांची संख्या मोठी होती. भांडणानंतर या दोन मुलांना (Hindu) शेजारी जळणाऱ्या आगीत फेकून दिले. एक मुलगा आगीत होरपळून मृत्युमुखी पडला, पण दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी जळालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. आजही येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आगीत भाजलेली मुले (Hindu) आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुलांमध्ये जुना वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आगीत भाजलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेशी संबंधित लोकांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आतापर्यंत या घटनेत सहभागी 8 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community