गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर

55
गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर
गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर

बिहारमधील बक्सरमध्ये हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे. इथे दोन पाद्रींवर ५० ते ६० महिला आणि पुरुषांना ख्रिस्ती धर्मांत धर्मांतरित केल्याचा आरोप आहे. याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे, पाद्री महिलांना गंगेत स्नान करायला लावत असून सुहासिनीचे कपाळावरील कुंकू पुसत आहे. (Hindu)

( हेही वाचा : बांगलादेशात ISKCON वर बंदी घातली नाही, तर हत्याकांड सुरूच राहणार; मौलवीचा युनूस सरकारला इशारा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला. यानंतर पोलिसांनी दोन्ही पाद्रींना अटक केली आहे. पाद्रींचे म्हणणे आहे की, सर्व व्यक्तींनी आपल्या मर्जीने धर्मांतर केले असून बाइबल वाचून त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण दि. १४ नोव्हेंबर रोजी सिमरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. या कटात सहभागी असणारा एक पाद्री सॅम्युएल तामिळनाडूतील रहिवाशी आहे. तर पाद्री राजू राम मसीह आणि राजीव रंजन राम हे बिहारचे रहिवाशी आहेत. (Hindu)

याप्रकरणी भाजपा नेता गिरीराज सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणात आदिवासींशी छेडछाड करण्यात आली आहे. गरीबांना प्रलोभने देऊन धर्मांतर करण्यात आले. त्यामुळे धर्मांतराविरोधात कठोर कायदा तयार करण्यात आला पाहिजे. प्रत्येक जिल्हा यामुळे त्रस्त आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.