लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असा दावा भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी केला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघ येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून टी. राजा सिंह यांना आमंत्रित करण्यात आले होते. (Hindu Dharma Sabha)
यावेळी ते या कार्यक्रमात काय बोलणार आहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणीदेखील टी. राजा यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत, असे आवाहनदेखील आमदार टी. राजा सिंह यांनी केले आहे. (Hindu Dharma Sabha)
(हेही वाचा – Delhi Metro : मेट्रो ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार ?)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे ३७० किल्ले जिंकले आहेत, मात्र आज त्यातील १०० किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बांधण्यात आले असल्याचे टी. राजा यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील हे सर्व अतिक्रमण हटवण्याची मागणी टी. राजा यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी होणाऱ्या धर्मसभेत काही महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.
धर्मसभेत महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी…
– धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा.
– वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा.
– लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करावा.
– गोहत्या बंदी कठोर करून त्याची अंमलबजावणी व्हावी.
– बेकायदेशीर भूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे.
हेही पहा –