‘सनातन संस्थे’चे (Sanatan Sanstha) संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने रविवार, २१ मे या दिवशी सायं ५ वा. ब्राह्मण सेवा मंडळ चौक, कबूतरखान्याच्याजवळ, दादर (प.) येथून ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. दादरमधील विविध भागात मार्गक्रमण करत शिवाजी पार्कजवळ या दिंडीचा समारोप होईल. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना, संप्रदाय, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी होणार आहेत.
आज कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदू धर्मीयांना (Sanatan Sanstha) जात, प्रांत, संप्रदाय आणि भाषा यांमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू ऐक्याचा विशाल अविष्कार दाखवून हिंदू बांधवांनी संघटित होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत, संघटिपणाचा संदेश देणाऱ्या या प्रबोधनपर ‘हिंदू एकता दिंडी’त लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही पहा –
हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या (Sanatan Sanstha) अंतर्गत गेली एक महिना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह देशभरात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणे, असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत. हिंदू एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. राष्ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांच्या महान कार्याविषयीचे प्रबोधनही या फेरीत केले जाणार आहे. हिंदू एकता दिंडी विषयी अधिक माहितीसाठी 9821015619 या क्रमांकावर संपर्क करा, असे सनातन संस्थेने आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community