Hindu : हिंदू व्यावसायिकांकरता आता हिंदू ग्राहकांची नोंदणी करण्यासाठी हिंदू ग्राहक जागृती अभियान; मंजिरी मराठे यांनी सांगितला उद्देश

हिंदूंपासून (Hindu) हिंदूपर्यंत ही ओम प्रतिष्ठानची संकल्पना आहे. आता आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याची जाणीव आपल्याला होतं आहे आणि या जाणिवेतून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अतिशय आवश्यक आहे, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.

139

ओम प्रमाणपत्राची सुरुवात वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. यानिमित्ताने अनेक व्यावसायिकांची आपण नोंदणी करून घेत आहोत, मग त्यात विक्रेता असतील, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा प्लम्बर, इलेक्ट्रिशियन असो त्यांना आपण ओम प्रमाणित करत आहोत. पण आता हिंदू (Hindu) ग्राहकांनाही जागृत करण्यासाठी हिंदू ग्राहक जागृती अभियान सुरु केले आहे. या माध्यमातून हिंदू ग्राहकांची नोंदणी होऊन हिंदू ग्राहकांचा प्रचंड मोठा डेटाबेस तयार होणार आहे. याचा उपयोग हिंदू व्यावसायिकांना होणार आहे. एखाद्या भागात किती हिंदू (Hindu) ग्राहक आहेत याची माहिती संबंधित हिंदू व्यावसायिकांना होऊन त्यादृष्टीने त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना लाभ होईल, त्यादृष्टीने या हिंदू ग्राहक जागृती अभियानाची सुरुवात गुढीपाडव्यापासून डोंबिवली येथून करण्यात आली आहे. असाच शुभारंभ नाशिक आणि पुणे येथे होत आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सांगितले.

हिंदू नववर्ष, चैत्र शुक्ल १, रविवार ३० मार्चला गुढीपाडव्यापासून हिंदू (Hindu) ग्राहक जागृती अभियानाला डोंबिवली येथील शिदोरी उपहारगृह येथून प्रारंभ करण्यात आला. ज्या अंतर्गत ओम प्रमाणित ग्राहकांची विनाशुल्क नोंदणी सुरू करण्यात आली. गुढीपाडवा या हिंदू नव वर्षाचे औचित्य साधून आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखा आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा मंजिरी मराठे, राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे डोंबिवली शहर प्रमुख मंगेश राजवाडे, प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक अमोल कोगेकर, ओम प्रतिष्ठानचे समन्वयक प्रसाद वडके, ध्रुव अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे, वृषाली देशपांडे, प्राचार्य डाॅ. विनय भोळे, सनातन संस्थेच्या अमृता संभूस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रघुवीर नगर गणेशोत्सव मंडळाचे डोंबिवली अध्यक्ष बिनेश नायर आणि मंडळाचे सदस्य यांचे विशेष योगदान लाभले. डोंबिवलीतील प्रथम ओम प्रमाणित उद्योजक शिदोरी उपहारगृहाचे संचालक अद्वैत जोशी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक हिंदू (Hindu) व्यावसायिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने www.ompratishthan.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

(हेही वाचा Hindu : ‘ओम प्रमाणपत्र’ला आता ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’ची जोड; गुढीपाडव्यापासून हिंदू ग्राहकांच्या नोंदणीला प्रारंभ)

हिंदूंना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ग्राहक जागृती अभियान 

हिंदूंपासून (Hindu) हिंदूपर्यंत ही ओम प्रतिष्ठानची संकल्पना आहे. आता आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याची जाणीव आपल्याला होतं आहे आणि या जाणिवेतून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी ओम प्रमाणपत्र वितरीत करत आहोत. तसेच आज आपण हिंदू ग्राहक अभियानाचा शुभारंभ देखील केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक हिंदूंनी ग्राहक म्हणून नोंदणी करायची आहे. संख्याबळ हीच हिंदूंची (Hindu) शक्ती असते, या सावरकरांच्या विचारांशी अनुसरून मुख्यत्व हिंदू संघटनाचे कार्य करायचे आहे. आपण सर्वांनी जात-पात, पंथ, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एक होण्याची गरज आहे. आता तरी जागे होऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे आपण रक्षण करून त्याचे रूपांतर हिंदू राष्ट्रात करुया. ही नांदी आर्थिक युद्धाची आहे आणि त्यात आपल्याला जिंकायचंच आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने (Hindu) व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठ्या संख्येने www.ompratishthan.org वर नोंदणी करण्याचे आवाहन मंजिरी मराठे यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.