‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची Hindu Janajagruti Samiti ची सरकारकडे मागणी !

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!

56
‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची Hindu Janajagruti Samiti ची सरकारकडे मागणी !

धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या विषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री, सांस्कृतीक कार्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना देण्यात आले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि प्रखर राष्ट्र-धर्म निष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. (Hindu Janajagruti Samiti)

(हेही वाचा – गुजरातच्या नगरपालिका निवडणुकीत Marathi भाषिकांचा डंका; १२ मराठमोळे नगरसेवक; भाजपाची एकहाती सत्ता)

छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झाले आणि त्यांच्या शौर्याने प्रखर स्वदेशप्रेम आणि धर्मनिष्ठेचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या कथेला जिवंत करतो. महाराष्ट्र सरकारने पूर्वी ऐतिहासिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले आहे. (Hindu Janajagruti Samiti)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : … म्हणून मुख्यमंत्री निवडण्यास होतोय उशीर!)

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणार्‍या महाराष्ट्रातील महायुती शासनाने ‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची आवश्यकता आहे. चित्रपटाचे दर कमी झाल्यास महाराष्ट्रातील समस्त युवक, विद्यार्थी आणि सामान्य जनता या चित्रपट पाहू शकेल. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचेल. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन होईल. भविष्यातही असे ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते प्रेरित होतील, असेही समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे. (Hindu Janajagruti Samiti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.