सनातन धर्म सभाच्या वतीने वसईतील बऱ्हामपूर येथील अयप्पा मंदिरात ७ आणि ८ जानेवारी २०२३ हे दोन दिवस हिंदू महासंमेलन २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतभरातील साधू-संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत. ‘साधुसंतांचा महाकुंभ’ असाही उल्लेख या महासंमेलनाचा करण्यात आला आहे.
सध्या हिंदू धर्म, धर्मातील परंपरा आणि धर्म विचार हे नव्या पिढीला ज्ञात करून देण्याची नितांत गरज बनली आहे. यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. विशेषतः पालघर जिल्ह्यात जिथे ख्रिस्ती धर्मांतराचे पेव फुटले आहे. अशा वेळी या भूमीत हे संमेलन आयोजित करून एक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्नही होणार आहे. या संमेलनासाठी देशभरातून हिंदुत्वनिष्ठ येणार आहेत. त्यांनी आगाऊ नोंदणी केली आहे. दोन दिवस मान्यवर आणि उपस्थितीतांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सनातन धर्म सभाचे आयोजक उत्तम कुमार यांनी दिली.
(हेही वाचा मी कुठं सांगितले माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला)
या महासंमेलनाला तुंगारेश्वर येथील बालयोगी सदानंद महाराज, स्वामी कृष्णानंद सरस्वती, के.पी. शशिकला, स्वामी चिदानंद पुरी, विश्वेश्वरानंद सरस्वती, संगमेशानंद सरस्वती, महंत सदानंदवन महाराज, शिवांगीनंद गिरी महाराज, शंकर गायकर, साध्वी प्राची आणि स्वामी संगम गिरी महाराज इत्यादी साधू-संत आणि महंत या संमेलनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
(हेही वाचा ‘वंचित’सोबत युतीची चर्चा : उद्धव सेनेसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर)
लव्ह जिहादबाबत प्रबोधन करणार
विशेष म्हणजे केरळात प्रसिद्ध आर्ष विद्या समाज संघटनेचे आचार्य के.आर. मनोज यांची विशेष उपस्थिती असणार आहे. ही संघटना लव्ह जिहादच्या माध्यमातून ज्या हिंदू मुलींना मुसलमान फसवून पळवून नेतात, त्यांना शोधून आणून त्यांचे प्रबोधन करते. अशा प्रकारे मुसलमानांच्या तावडीतून सोडवून आणलेल्या १० हिंदू मुलीही या संमेलनात सहभागी होणार आहेत. सध्या या मुली समाजात लव्ह जिहादबाबत हिंदू मुलींमध्ये प्रबोधन करत आहेत. या संमेलनात या मुली त्यांचे अनुभव सांगणार आहेत.